शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे जानेवारीत मिळणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह येत्या ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत, निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिले.मात्र, महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने २ हजार ९४० शेतकऱ्यांची नऊ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही. या बैठकीला आ. अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच, भारतीय कृषी पीकविमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम.एस. सावंत, कृषी अधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने गुरुवारी मंत्रालयात मुंडे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मुंडे यांनी पैसे अदा करण्याबाबत विमा कंपन्यांना सूचना केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत