देशातील 70 हजार आशा स्वयंसेविका बेमुदत संपावर

मानधनवाढीची फक्त घोषणा, अंमलबजावणी नाही
12 जानेवारीपर्यंत मानधनवाढीचा शासन आदेश न काढल्यास राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. तुटपुंज्या पगारावर काम करत असलेल्या राज्यातील 70 हजार आशा सेविका व तीन हजार गटप्रवर्तकांची मानधन वाढीची मागणी आहे. या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आज शुक्रवारपासून ऑनलाईन कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची महत्त्वाची कामे सांभाळणाऱया आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती.
परंतु, प्रत्यक्षात आरोग्य विभागाने शासकीय आदेश न काढल्याने राज्यातील 70 हजार आशा सेविका व तीन हजार गटप्रवर्तकांनी आज, शुक्रवारपासून ऑनलाईन कामबंद आंदोलन पुकारले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आशा सेविकांनी मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाची सरकारने दखल घेतली नाही, असे संघटनेच्या पत्रकात नमूद केले आहे. परिणामी 29 डिसेंबरपासून आशा सेविकांनी बेमुदत ऑनलाईन कामबंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आशा संघटनेचे नेते एम. ए. पाटील यांनी म्हटले आहे.
12 जानेवारीपर्यंत मानधनवाढीचा शासन आदेश न काढल्यास राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत