महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

नळदुर्ग शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे आजी माजी आमदाराचे दुर्लक्ष, बेरोजगारी वाढली

शहराच्या अधोगतीला व बकाल व्यवस्थेला आजी – माजी आमदार जबाबदार . अशोक जगदाळे

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहराच्या अधोगतीला व बकाल अवस्थेला तालुक्याचे आजी–माजी आमदार जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी पत्रकार परीषदेत बोलतांना केला आहे.
दि.२४ डिसेंबर रोजी नळदुर्ग येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी पत्रकार परीषद घेऊन नळदुर्गच्या अधोगती तसेच बकाल अवस्थेला तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील व माजी आमदार मधुकरराव चव्हाण हेच जबाबदार आहेत असे म्हटले आहे. नळदुर्ग शहराच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी या मंडळींनी कांहीच प्रयत्न केले नाही.याचा परीणाम म्हणुन आज नळदुर्ग शहर विकासाच्या बाबतीमध्ये फारच मागे राहिला आहे. नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा देणे, नळदुर्ग शहरात अप्पर तहसिल कार्यालय सुरू करणे, नळदुर्ग शहरांतील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी औद्योगिक वसाहत उभारणे व नळदुर्ग येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणे,या शहर वासियांच्या महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे कायम आजी–माजी आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. केवळ विकासाचे गाजर दाखवुन नळदुर्गकराना झुलत ठेवण्याचे काम या आजी–माजी आमदारांनी केले आहे. केवळ सभागृह बांधणे व रस्ते तयार करणे म्हणजे विकास होत नाही हे आजी–माजी आमदारांना समजलेच नाही असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.
नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न शासन दरबारी अनेक वर्षांपासुन रेंगाळत पडला आहे. तालुका निर्मितीचा प्रश्न जे २५ वर्षे आमदार म्हणुन राहिले त्यांनीही तो सोडवण्यासाठी प्रयत्न केला नाही. कायम नळदुर्ग शहराला सापत्नीक वागणुक देण्याचेच काम माजी आमदारांनी केले आहे. त्याचबरोबर विद्यमान आमदारांनीही विधानसभेत कधीच नळदुर्ग शहराच्या विकासासंदर्भात कुठला प्रश्न गेल्या चार वर्षात उपस्थित केला नाही. नळदुर्ग शहरात औद्योगिक वसाहत निर्माण केली तर शहरातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या नळदुर्ग शहरांतील बाजारपेठ कायम ओस पडल्यासारखे दिसते कारण परगावची माणसे शहरात येण्यासाठी शहरांमध्ये तहसिल कार्यालय किंवा अप्पर तहसिल कार्यालय असणे अत्यंत गरजेचे आहे. आज नळदुर्ग सारख्या शहरात एकही शासकीय कार्यालय नाही ही खेदाची बाब असुन याला सर्वस्वी जबाबदार तालुक्याचे आजी–माजी आमदार आहेत असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.
माजी आमदारांनी तालुक्याच्या प्रश्नावर २५ वर्षे नळदुर्गकरांना झुलवत ठेवले तर विद्यमान आमदारांनी औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर नळदुर्गकरांना झुलवत ठेवले आहे. आजी–माजी आमदारांनी ठरवुन नळदुर्ग शहराला विकासापासुन दुर ठेवण्याचे पाप केले असल्याचा आरोपही अशोक जगदाळे यांनी केला आहे. औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यु पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात तालुक्यातील कासारशिरशी येथे अप्पर तहसिल कार्यालय शासनाकडुन मंजुर करून आणुन ते चालुही केले. मात्र आमचे आमदार नळदुर्ग येथे नळदुर्गकरांची मागणी असतानाही शहरात अप्पर तहसिल कार्यालय मंजुर करून आणण्यात पुर्णपणे अपयशी ठरले असल्याचेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.
नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळणे, नळदुर्ग येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणे, शहरात औद्योगिक वसाहत निर्माण झाले तरच शहराचा विकास होणार असल्याचेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!