
भारतीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. १९५४ मध्ये मेजर जनरल इनायत हबीबुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन बदली या मोहिमेचं स्मरण करण्याचा या फेरीचा उद्देश आहे. देहराडून इथून सुरू झालेली ही फेरी ग्वाल्हेर, नाशिक आणि मुंबई अशा, सशस्त्र दलांच्या महत्त्वाच्या तळांवरून सहा दिवसांत पुण्यात पोहोचेल आणि विसर्जित होईल. चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जे. पी. मॅथ्यू यांनी काल नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं संयुक्त सेवा विभाग आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कार फेरीला हिरवा झेंडा दाखवला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत