क्रिकेटभारत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातला एकमेव कसोटी सामना भारताने जिंकला…

आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियानं कालच्या ५ बाद २३३ या धावसंख्येवरून आपला दुसरा डाव पुढे सुरु केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर इथं झालेला एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ खेळाडू राखून पराभव करत भारतानं ही मालिकाही जिंकली.मात्र केवळ २८ धावांची भर घालून त्यांचा संपूर्ण संघ माघारी परतला. स्नेहा राणा हीनं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ४ खेळाडू बाद केल्या. भारतानं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर १८७ धावांची आघाडी मिळवल्यानं, दुसऱ्या डावात भारतापुढे विजयासाठी केवळ ७५ धावांचं आव्हान उरलं. भारताच्या संघानं ते केवळ दोन खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं. सामन्यात ७ खेळाडू बाद करणाऱ्या स्नेहा राणा हिला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं. या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी.ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!