देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

एका सजग भारतीय नागरिकाचे मनोगत…JK

👉 तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांची हुकूमशाही दाखवली की ते तुम्हाला इंदिराजींची आणीबाणी सांगतील.

👉 तुम्ही त्यांना अल्पसंख्याकांच्या होणाऱ्या मॉब लिचिंग बाबत विचाराल तर ते तुम्हाला काश्मिरी पंडितांची आठवण करून देतील.

👉 तुम्ही बेरोजगारी बाबत प्रश्न उपस्थित कराल तर ते हिंदुत्वाची झूल पांघरतील. राम मंदिर आणि ट्रिपल तलाक विरोधी कायद्याचे महत्व अधिरेखीत करतील.

👉 तुम्ही शेतकरी समस्या आणि दुष्काळाबाबत बोलाल तर ते तुम्हाला सिंचन घोटाळ्याची आठवण करून देतील.

👉 तुम्ही डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेबाबत शंका उपस्थित कराल तर ते ५ ट्रेलियन अर्थव्यवस्थेचे गाजर दाखवतील.

👉 तुम्हाला धार्मिक सलोख्याची काळजी वाटत असेल तर ते तुम्हाला यापूर्वी हिंदू कसा खत्रे में होता हे समजावून सांगतील.

👉 तुम्हाला देशातील जनतेच्या मूलभूत गरजा अधिक गरजेच्या वाटत असतील तर ते तुम्हाला हिंदुराष्ट्राचे महत्व पटवून देतील.

👉 तुम्हाला गेल्या पाच वर्षांत देशाची झालेली अवस्था चिंतेत टाकत असेल तर ते तुमच्याकडे ७० वर्षांचा हिशोब मागतील.

👉 धोक्यात आलेली लोकशाही आणि स्वायत्त संस्थांचे होत असलेले मोदीकरण तुम्हाला देशद्रोह वाटत असेल तर ते तुम्हालाच देशद्रोही ठरवतील.

👉 राजकीय नेतृत्वाचा सुरू झालेला घाऊक खरेदीबाजार आणि जनमताची चेष्टा तुम्हाला किळसवाणी वाटत असेल तर ते तुम्हाला आपदधर्म शिकवतील.

👉 बघता बघता जगातील सर्वोत्तम लोकशाही भांडवलदारांच्या चरणी लिन होत असलेली बघून तुम्हाला दुःख होत असेल तर ते तुम्हाला स्वदेशीचे महत्व समजावून सांगतील.

👉 देशाची खरी ताकद सर्वधर्म समभाव आणि धार्मिक सलोखा हीच आहे हे असे तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्हाला समरसता आणि जातिव्यवस्थेचे महत्व पटवून देतील.

👉 तुमच्या डोळ्यादेखत गेल्या ७० वर्षांत जनसामान्यांच्या काबाड कष्टातून उभा राहिलेला हा देश भांडवलदारांच्या स्वाधीन होत असताना तुम्हाला वेदना होत असतील तर ते भांडवलदारांचे देशाच्या उभारणीतील योगदान अधोरेखित करतील.

👉 सांगण्यासारखे खूप काही असले तरी या सर्व मुद्यांचं तात्पर्य हेच आहे की, त्यांनी त्यांच्या प्रत्येक दुष्कृत्यासाठी त्यांच्या समर्थकांना पटेल असे काहीना काही समाधान शोधून ठेवलेले आहे.

👉 आजचा त्यांचा नंगानाचही देशातील एका विशिष्ट वर्गाला देशहित वाटावा असे वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

👉 ज्या स्वायत्त संस्थांच्या स्वायत्ततेमुळे देशातील लोकशाही गेली ७० वर्षे आपले अस्तित्व खंबीरपणे टिकवू शकली तीच लोकशाही आज खलनायक ठरवली गेल्याने स्वायत्त संस्थांचे होत असलेले मोदीकरण त्यांच्या समर्थकांत उत्साह भरत आहे.

👉 देशाची वाटचाल प्रचंड वेगाने अधोगतिकडे सुरू असली तरी मोदी नावाच्या ईश्वरी अवताराच्या ती हातात असल्याने त्यांना त्याचे अजिबातही सोयरसुतक नाही ही वस्तुस्थिती आहे.

👉 इतका प्रचंड गोंगाट करावा की विरोधाचा आवाजच क्षीण होऊन जाईल, जनसामान्यांच्या कानापर्यंत पोहोचणारच नाही ही त्यांची रणनीती सध्या तरी चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येत आहे.

👉 देशाची आगामी वाटचाल आणि त्याचा मार्ग त्यांनी आधीच निवडून ठेवलेला आहे. तुम्हाला तो पटत असेल तर ठीक नाही तर ते तुमच्याशिवायही त्यांच्या उद्दिष्टाप्रत पोहोचू शकतात याची त्यांना आता खात्री आहे.

👉 प्रवाहासोबत वाहत जाऊन मूर्खांसोबत बुडून मरायचं की प्रवाहाविरोधात शड्डू ठोकून आपल्या भावी पिढ्यांना गुलामगिरीत जाण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करायचे हा सारासार वैयक्तिक निर्णय आहे. माझा अजूनही देशातील सामान्य जनतेच्या विवेकबुद्धीवर विश्वास आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!