तुळजापूर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा-मधुकरराव चव्हाण

अनुदानामध्ये तुळजापूर तालुक्याचा समाविष्ठ व्हावा
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
धाराशिव जिल्हा महाराष्ट्र मध्ये एक मागासलेला जिल्हा म्हणून याची चांगलीच ओळख आहे तुळजापूर तालुका आई तुळजा भवानीचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर तालुक्यावर सरकारने अन्याय करू नये तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे आणि त्यांचा समावेश अतिवृष्टी अनुदान यादीमध्ये व्हावा आशी मागणी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
तुळजापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन सोयाबीनचे अतोनात नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन सोयाबीन पाण्यात उभा आहे सोयाबीन काढण्यासाठी गेलेल्या मजुरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे शिवाय चिखलातून मार्ग काढावा लागत आहे
अतिवृष्टीच्या अनुदानातून तुळजापूर तालुका वगळण्यात आलेला आहे हा अन्याय असून युती सरकारने याबाबत रीतसर तुळजापूर तालुक्याला अतिवृष्टीच्या अनुदानात समाविष्ट करण्यात यावे
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या आई तुळजाभवानीचे दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूर तालुक्यामध्ये दाखल होतात याच तालुक्यातील शेतकऱ्यावर शासनाने अन्याय करू नये अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदान यादी मध्ये नाव समाविष्ट करून सर्व शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत