क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेवर आज सकाळी भेट देऊन पाहणी केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य लक्षात राहावं आणि भिडेवाडा इथं मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे पुढच्या पिढीला कळावं या पद्धतीनं सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात स्मारकासंदर्भातल्या आढावा बैठकीत दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत