रशियानं लष्करात नेपाळी नागरिकांची भरती करू नये, अशी नेपाळची सूचना…

रशियातल्या लष्करात असलेल्या नेपाळी नागरिकांना परत पाठवण्यासही नेपाळनं सांगितलं आहे.नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की रशियातल्या लष्करातील नेपाळी जवानांचे मृतदेह नेपाळमध्ये पाठवण्याची विनंती नेपाळमधील रशियाच्या राजदूतांमार्फत करण्यात आली आहे आणि मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासही सांगण्यात आलं आहे.अधिकृत आकडेवारीनुसार,रशियातल्या लष्करात सुमारे दोनशे नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. रशियानं लष्करात नेपाळी नागरिकांची भरती करू नये,अशी सूचना नेपाळनं केली आहे.युक्रेनमध्ये रशियासाठी लढताना धारातीर्थी पडलेल्या नेपाळी नागरिकांची संख्या सातवर गेल्यानंतर नेपाळनं ही सूचना केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत