नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते महेश घोडके हे मराठवाडा युवा गौरव पुरस्काराने सन्मानित

नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते महेश घोडके हे मराठवाडा युवा गौरव पुरस्काराने सन्मानित .
ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्ञानकिरण सामाजिक संस्था अणदूर ता तुळजापूर जि धाराशिव या संस्थेच्या वतीने मराठवाडा युवा गौरव पुरस्काराचे वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता . हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे तुळजापूरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार अरविंद बोळंगे जेष्ठ साहित्यीक सुरेश वाघमारे नळदुर्ग ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे अणदूर येथील सरपंच तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामदादा आलुरे पुण्य नगरीचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी धनंजय रणदिवे यांच्या प्रमुख हस्ते महेश घोडके यांना मराठवाडा युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
ज्ञानकिरण सामाजिक संस्था अणदूरच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात मराठवाडा युवा गौरव पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे यांनी केले धाराशिव जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील मान्यवराना गौरविण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या अनेक वर्षांपासून उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते महेश घोडके यांना सन्मानित करण्यात आले .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भैरवनाथ कानडे लिखीत आज काल आणी उदा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरव यांनी केले तर शेवटी आभार बनसोडे यांनी मानले .
कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत