भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार जाहीर….

यावेन्द्रो मातोश्री रुक्मिनी फाउंडेशन या ट्रस्टच्यावतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्याथ्यांसाठी तसेच सम्यक अॅकॅडमी व लोकराजा फाउंडेशनच्या संविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना शिष्यवृत्ती वाटप होईल.नामदेवराय भालशंकर गौरव समितीतर्फे नामदेवराव भालशंकर यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण व शिष्यवृती वाटप समारंभ २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृह येथे आयोजिल्याची माहिती गौरव संयोजक अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भगवान गौतम बुद्ध विशेष जीवनगौरव पुरस्कार – प्राणिमित्र विलास शहा (मावा), विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विशेष जीवनगौरव पुरस्कार पार्थ पोळके (सातारा), राजपी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार – प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे (कोल्हापूर), महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार – राजेंद्र मागाडे (पुणे), छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार दिगंबर देपे (सोलापूर), छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रा. तानाजी ठोंबरे (वाशी), माता रमाई भीमराव आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार धम्मरखिता कांबळे (सोलापूर), राष्ट्रसंत गाडगेवाया गुणवंत कर्मचारी पुरस्कार – माधव माने (म्हेंसगाव, ता. माढा) आदी मान्यवरांना सपत्नीक देऊन गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पोलीस निरीक्षक दंसा शेख, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरफले, उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, स्वाती हवेव्ळे, जैन गुरुकुलने प्राचार्य आशुतोष शहा, निवृत पोलोस उपनिरीक्षक केरू जाधव आदींची उपस्थिती राहणार असल्याचे भालशंकर यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत