२० डिसेंबरला धरणे आंदोलन भूमिहीन कुटुंबांना गायरानच्या जमिनी देण्याच्या मागणी.

या मागणीसाठी दिनांक २० डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशीही माहिती देण्यात आली आहे. भूमिहीन कुटुंबांना गायरान आणि देवस्थानच्या अखत्यारीत स्थावर मालमत्ता असेलल्या जमिनी कसण्यासाठी देण्यात याव्यात अशी मागणी भारतीय दलित ऐक्य कृती समिती च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे,
भुमीहिन कुटुंबांना गायरानच्या, देवस्थानच्या, शासकीय स्थावर मालमत्ता असलेल्या जमिनीवर सरसकट पाच एकरचा बिनाअट सातबारा मिळावा किंवा कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी दि.२०/१२/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर एक दिवसीय धरणे आंदोलन चे आयोजन करण्यात आले आहे. तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व भुमीहिन कुटुंबातील व्यक्तींनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे व आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे. ही विनंती हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील ५० च्यावर गावात पत्रके लावुन भुमीहिन शेतमजूर सर्वसामान्य जनता एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक दादासाहेब जेटीथोर, जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश बनसोडे, जिल्हा संपर्कप्रमुख कॉ. जनार्दन वाळवे, मराठा आघाडी प्रमुख मोहनराव पाटील, तालुका कार्याध्यक्ष मोहनराव मोहिते, महेश उपासे, शांताई गवळी, सुदर्शन बनसोडे हे कष्ट घेत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत