तेलंगणात सिलिंडर ५०० रुपये तर महाराष्ट्रात ९३० रुपयाला!

माहूर, किनवट या तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणात सिलिंडर ५०० रुपयाला तर महाराष्ट्रात ९३० रुपयांना सिलिंडर मिळत असल्याने गृहीणींमध्ये चर्चा आहे. नुकत्याच पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या. यात तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेवर आली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी निवडणूक जाहीरनाम्यानुसार घरगुती गॅस सिलिंडर केवळ ५०० रुपये देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी सुरु केली.
माहूर – किनवट तालुका हा तेलंगणा सीमावर्ती भागाने व्यापला आहे. या दोन्ही तालुक्यातील नातेगोते, व्यापारी व हितसंबंध आहेत. तेलंगणाचा आदिलाबाद जिल्हा या भागाला लागून असल्याने खरेदी विक्री व्यवहार ही होत असतात. नुकत्याच संपन्न झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात माहूर – किनवट तालुक्यात नेते, कार्यकर्ते तिकडे असलेल्या मराठी भाषिक मतदारांना आपल्या पक्षाकडे वळविण्यासाठी तळ ठोकून बसले होते. निवडणुकी दरम्यान तेलंगणात काँग्रेसने ५०० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी सिलिंडरचे दर कमी केले. त्याचे लोण महाराष्ट्रात पोहचले असून संभाव्य लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातही घरगुती सिलिंडरचे दर कमी होतील अशी आशा सीमावर्ती भागातील गृहिणींना आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत