महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.

ही परीक्षा कोल्हापूर जिल्हातील 69 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार. परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 26325 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात झालेली आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र परिषदेच्या www.mscepune.in http:://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिन मध्ये दिनांक 11 डिसेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेश पत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.
सदर प्रवेश पत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही )तसेच जन्मतारीख ,आधार कार्ड इत्यादी मध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी 23/12/2023 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष,अथवा ईमेल) द्वारे तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत असे निवेदन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून प्राप्त झाले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी असे आव्हान माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर यांनी केले आहे यांनी केलेले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत