कांद्याची साठवण साडे सात महिन्यांपर्यंत वाढविणारं भाभा अणु केंद्राचं संशोधन

अणु ऊर्जा विभागाच्या कार्यरत भाभा अणु संशोधन केंद्रानं कांद्याशी निगडीत शीतगृहांचा वापर करुन एक समन्वित कार्यान्वयन प्रक्रिया विकसित केली. यामध्ये रबी हंगामातील कांद्याचा साठवण कालावधी साडे सात महिन्यांपर्यंत वाढू शकते. या क्रांतिकारी शोधामुळे कांद्याचं साठवण आयुष्य वाढतं आणि त्याचा उच्च दर्जा टिकून राहण्याची खात्री .महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या कृषक अन्न विकीरण सुविधेत या तंत्रज्ञानाच्या संवर्धन चाचण्या करण्याची व्यवस्था करण्यात आली .भाभा केंद्राच्या या शोधामध्ये तापमान,आर्द्रता आणि कार्बन-डायऑक्साईड यांचं नियंत्रण करुन विकीरण प्रक्रिया केलेल्या कांद्याची साठवण केली. हंगाम-पश्चात होणारे नुकसान प्रभावीपणे नियंत्रित करता येईल व कांद्याच्या किंमती स्थिर राखण्यात मदत होईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत