लढा संविधान रक्षणाचा!

©️®️ ✍️ भरत आ. शिरसाठ
एरंडोल जि. जलगांव
मो. 7387632583
…………………………………………
त्यांनी संसद मार्गावर संविधान जाळलं
तुम्ही चूप राहिलात
त्यांनी परभणी मध्ये संविधानाची तोडफोड केली
तुम्ही तरीही चूप राहिलात
आज सोमनाथ या लढाईत शहीद झाला
तुम्ही तरीही चूप आणि चूपच आहात
हे तुमचं चूप राहणं
मोठा फरक पाडणारं आहे
आज ना उद्या या देशाला
पुन्हा गुलामीत ढकलणारं आहे
तुम्ही माळी असा, कोळी असा की साळी असा
की असा कुंभार, लोहार, सुतार
सार्यांचं आयुष्य येथे संविधानानं बदललं आहे
जो माणूस नव्हता तो राजा बनला
गुलामीच्या बेड्या तुटून आझाद झाला
हे सारं केवळ संविधानामुळे आहे
जातीभिमान असलेली लोकं
देशाभिमान दाखवत नाहीत
देशाभिमान नसलेली लोकं
स्वातंत्र्य राखू शकत नाही
हे त्रिकालाबाधित सत्य आहे
त्या पेक्षाही मोठं सत्य हे की
ज्या संविधानानं हा देश अभेद्य ठेवला
त्या संविधान रक्षणाचा लढाच येथे
आज आतंकवादी ठरू पाहत आहे
एकटी आहेत….
या लढ्यात प्रज्ञासूर्य बा-भिमाची लेकरं एकटी आहेत
कारण समतेचा अर्थ केवळ त्यांना कळला आहे
मागील पंचाहत्तर वर्षापासून
ही लढाई ते लढत आले आहेत
आणि पुढे सुद्धा लढणार आहेत
कारण त्यांना नाद जडलाय
समतेचा…
न्यायाचा…
आणि स्वातंत्र्याचा!
या प्रज्ञासुर्याचं शेेवटचं एक लेकरू
जरी शिल्लक राहिलं
तरीही ही लढाई
संपणारी नाही…….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत