मुख्य पान

जन्मदिवस साजरा करण्याची परंपरा ही मौर्य शासकांनी सुरू केली होती.

आतापर्यंत जो काही इतिहास समोर येऊ शकला आहे, त्यानुसार भारतामध्ये जन्मदिवस साजरा करण्याची परंपरा मौर्य शासकांनी सुरू केली. भागवत शरण उपाध्याय स्ट्रेबो (अमेसिया 64 ईसा पूर्व-19) अभ्यासपूर्ण अध्ययन करून लिहीले आहे की चंद्रगुप्त मौर्य आपला जन्मदिवस दरवर्षी मोठ्या उत्सवाच्या रूपामध्ये साजरा करत होता. (ब्रुहतर भारत पृष्ठ क्रमांक 35, 36).

सम्राट अशोक सुद्धा असाच आपला वार्षिक जन्मोत्सव साजरा करीत होता आणि इतिहासकारांनी संकेत केला आहे की अशाच प्रकारे वार्षिक जन्मदिनाच्या उत्सवानिमित्त वर्षातून एकदा कैद्यांना मुक्त करण्याची परंपरा सुद्धा चालू केली होती. (प्राचीन भारत का राजनीतिक एवं सांस्कृतिक इतिहास, पृष्ठ क्रमांक 321)

सम्राट अशोक याला अष्टमीच्या दिवसाविषयी फार प्रेम होते, असे संकेत मिळते. त्याने प्रत्येक पक्षा च्या अष्टमीच्या दिवशी बैल ,बकरा ,भेडा ,सुवर आणि अशाप्रकारे इतरही जीवांच्या हत्येवर प्रतिबंध घालण्याचा आदेश जाहीर केला होता. (पाटलीपुत्र की कथा, पृष्ठ 152)

पाटलीपुत्रच्या ज्या वार्षिक महोत्सवाचा उल्लेख मोठ्या गर्वाने चिनी प्रवासी फाहियान (इसवी सन 399-411) याने उल्लेख केला आहे, तो उत्सव चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी साजरा केला जात होता. फाहियान याने लिहिले आहे की वीस मोठे आणि सुशोभित रथांचे विशाल जुलूस प्रत्येक वर्षी काढल्या जात आहे आणि दुसऱ्या महिन्याच्या आठवी तिथीला यांना शहरांमध्ये फिरविल्या जात आहे. अशाच प्रकारचे जुलूस इतरही शहरांमध्ये सुद्धा काढल्या जात आहे (प्राचीन भारत का इतिहास बी.डी.महाजन पृष्ठ 463)

अनेक इतिहासकारांनी पाहियान याने उल्लेखित केलेला वार्षिक उत्सवाची तिथी समजून घेण्यास चूक केली आहे. ते आजच्या हिंदी कॅलेंडरच्या माहे-गणना -प्रणालीला स्मरणात ठेवून वैशाख समजल्या गेले आहे. कारण की आजच्या तारखे मध्ये वैशाख हा हिंदी कॅलेंडरचा दुसरा महिना आहे.

परंतु हा फाहीयान आज पासून जवळपास 1600 वर्षापूर्वी गुप्त काळामध्ये भारतात आला होता आणि त्यावेळी वर्षाचा पहिला महिना फाल्गुन होता. तुम्ही कॅलेंडर सुधार समिती:( 1955 ई.) च्या अहवालाची तपासणी करून घ्या. त्यामधील लिहिले आहे की जो उत्सव चौदाशे वर्षा अगोदर ज्या ऋतूमध्ये साजरा केला जात होता, तो 23 दिवस मागे गेला आहे.

आज वर्तमानामध्ये वसंत संपात चैत्र महिन्यामध्ये होत आहे. म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदेला वर्षाचा पहिला दिवस समजल्या जात आहे. वसंत संपात दरवर्षी 20 मिनिट 24.58 सेकंड अगोदर होऊन जात आहे. म्हणून फाहियान च्या कालखंडामध्ये संवत्सर चा प्रथम महिना फाल्गुन होता आणि वर्षाचा दुसरा महिना चैत्र होता.

म्हणून फाहियान ने ज्या वार्षिक उत्सवाचा उल्लेख आपल्या प्रवास वर्णनामध्ये केला आहे, तो चैत्र शुक्ल अष्टमी ला साजरा करण्यात येणारा अशोका अष्टमी आहे. अशोका अष्टमीचे विस्तृत वर्णन आपल्याला कृत्यरत्नावली, कुर्मपुराण आणि परिचय यामध्ये आढळून येत आहे (पुराणकोश पृष्ठ 36)

परंतु पौराणिक संदर्भानुसार अशोका अष्टमी मध्ये अशोक वृक्षाचे महत्त्व सांगितलेले आहे. आता आपण अशोक वृक्ष आणि सम्राट अशोक यांच्यामधील संबंधाची तपासणी करण्यासाठी बौद्ध ग्रंथ दिव्यावदान चे अध्ययन करूया, यामध्ये लिहिले आहे की नामसाम्य च्या कारणामुळे सम्राट अशोकाला अशोक वृक्ष खूप प्रिय होता या हजारी प्रसाद द्विवेदी चा त्या चंवरधारणी लक्ष्मी ची आठवण करा जो मथुरा संग्रहालयामध्ये अशोका च्या वृक्षाचे रोपटे घेऊन उभी आहे.

या सर्व महत्वपूर्ण अध्ययनावरून सिद्ध होते की चैत्र शुक्ल अष्टमी ला साजरा करण्यात येत असलेला वार्षिक उत्सव अशोका अष्टमी हा खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाचा जन्मदिवस आहे, ज्यामध्ये पुराणकारांनी मोठ्या सावधगिरीने सम्राट अशोक त्याला वगळून केवळ अशोक वृक्षासोबत जोडून दिले आहे.

तथागत बुद्ध आणि सम्राट अशोक इत्यादीच्या कालखंडामध्ये तर जानेवारी ,फेब्रुवारी, मार्च ,एप्रिल, मे या महिन्यांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. आता तुम्ही एकदा पाहिलेले आहे की अशोक सम्राट यांची जयंती 14 एप्रिल 2016 ला आली होती. हा एक अतिशय महत्त्वाचा योगायोग आहे कारण अशोक सम्राट याची जयंती दरवर्षी 14 एप्रिल ला येणार नाही. दरवर्षी त्याची तारीख बदलत राहते कारण ही तारीख इंग्रजी कॅलेंडरच्या कालगणने नुसार नसून चंद्राच्या काल गणनेवर आधारित आहे – – अशोकाष्टमी.

तुम्हाला तर माहितीच असेल की संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा सम्राट अशोक याचे अभिलेख मोठ्या प्रमाणात सापडलेले आहे. परंतु पाटलीपुत्रांमध्ये म्हणजे आजचे पटना येथे सम्राट अशोकाचा एकही अभिलेख सापडलेला नाही. तरीपण कोणताही इतिहासकार असे म्हणू शकत नाही की, आपली पाटलीपुत्र येथे अशोक सम्राटाची राजधानी नव्हती. खरा इतिहास कितीही मिटविला तरी तो मिटत नाही. जरी मिटविला तरी तो जनतेच्या आठवणीमध्ये जिवंत असतो.

स्ट्रोबोने लिहिले आहे की चंद्रगुप्त मौर्य आपल्या जन्मदिवसाच्या भर दरबारामध्ये शाही आंघोळ करून डोक्याचे केस धूत होता, दरवर्षी पुन्हा पुन्हा केला जाणारा अभिषेक होता आणि अतिशय प्रचंड उत्साहाने साजरा केला जात होता.

तुम्हा लोकांना तर माहीतच असेल की जन्मदिवस साजरा करण्याची ही परंपरा मोरयांनी सुरू केली. या संदर्भातील चित्र साची स्तूपाच्या पूर्व दिशेला असलेले तोरण द्वाराच्या खालील बंडेरी वर कोरलेले आहे.

आज तेथे असलेले हे शिल्प केवळ अर्ध्या पाऊण शतकाच्या नंतर निर्माण केलेले आहे. सम्राट अशोक हत्तीवरून उतरून उभे आहे त्याच्यासमोर एक भावना आणि दोन्ही बाजूने चंवर धारणीयां यांच्या मागे राणी दिसून येत आहे.

ते दृश्य अशोकाष्टमीचे आहे.

सनातनी बुद्धिस्ट प्रा. गंगाधर नाखले
17/03/2025,7972722081

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!