भाजपचा अख्खा बाजार उठवून टाकू – सुजात आंबेडकर

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. त्यांना बळ दिले पाहिजे. ते जे काही करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. राज्यात शाळा अंगणवाडी यांचे कंत्राटीकरण सुरू आहे. आपल्या इथल्या मुलांना नोकरी नाही. नोकऱ्या बंद केल्या. आरक्षण बंद करण्यासाठी कंत्राटी नोकर भरती सुरु आहे. कंत्राट हे खासदार, आमदार यांच्या पोरांना दिले जातेय. अजित पवार यांच्या सालगड्याला कंत्राट दिले जातात. ठेक्यावर देवून ठेवला महाराष्ट्र माझा असे म्हणायची वेळ आली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी काल सभेत बोलताना एका पक्षाचे सरकार नको अशी भूमिका मांडली ती योग्य आहे. राज्यात नेहमी युतीचे सरकार आले आहे. आज भाजपने पक्ष फोडून सरकार बनवले आहे. ज्या राष्ट्रवादीला मतदान केले. त्याला भाजपने सत्तेत बसवले त्यामुळे बरेच मतदार नाराज झाले आहेत. आमदार जर भाजपात जाऊन बसणार असतील तर त्यांना मतदान कोण करणार? त्यामुळे हे सरकार डगमगणारे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
दिल्लीत एक जण म्हणतात ‘नफरत के बाजार मे मोहबत का दुकानं’. मी त्यांना इतकचं सांगेन एवढया मोठ्या द्वेशाच्या बाजारात छोट दुकान कसं चालेल? प्रकाश आंबेडकर यांना एकदा आजमावून बघा. भाजपचा अख्खा बाजार उठवून टाकू असा इशारा त्यांनी दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत