मुनगंटीवार यांची किळसवाणी आरडाओरड; महिलांना शरमेने मान खाली घालायला लावणारा भाजपा चा निवडणूक प्रचार ?

चंद्रपूर: लोकसभा 2024 चे चंद्रपूर मधून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथे सभा झाली. सभेला प्रधानमंत्री मोदी यांची उपस्थिती होती. यावेळी जनतेला संबोधतांना चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. असभ्य भाषेत जोरजोरात ओरडत भाषण करत त्यांनी प्रचाराची खालची पातळी गाठली यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस विरूध्द बोलताना 1984 च्या दंग्यांची आठवण करून देत त्यांनी असभ्य भाषेत परिस्थितीचे वर्णन केले.
काँग्रेसवर टीका करताना मुनगंटीवार यांनी असभ्य भाषेचा वापर केला. त्यामुळे उपस्थितांचे विशेषतः महिलांचे डोके शरमेने झुकले. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसविरोधात वापरलेल्या भाषेबाबत आता जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे संस्कार इतके खालच्या दर्जाचे आहेत हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीपूर्वी मुनगंटीवार यांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणादरम्यान मुनगंटीवार यांनी बहीण-भावाचा नात्याबाबत असभ्य भाषा वापरली. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेडवर भाऊ-बहिणींना विवस्त्र झोपवणारा पक्ष असे वर्णन केले. मुनगंटीवार यांच्या तोंडून असा शब्दप्रयोग ऐकून उपस्थित श्रोते अवाक् झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत