सांस्कृतिक क्षेत्रात राजकारण योग्य नाही मंत्री उदय सामंत यांचं स्पष्ट मत…

बालगंधर्व रंगमंदिरापासून गणेश कला क्रीड़ा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या या भव्य शोभायात्रेत ३०० दुचाकी, १० रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीला उतरलेल्या १०० व्यक्तिरेखांचा समावेश. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहोळ्यानिमित्त काल पुण्यात शोभायात्रा आणि दुचाकी फेरी काढण्यात आली. दीडशे कलाकारांच्या सहभागानं रंगलेला भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ हे या शुभारंभ सोहळ्याचं आकर्षण ठरले. यावेळी नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा रंगमंच इथे यानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना राज्याचे मंत्री आणि रत्नागिरी जिल्हा नाट्य परिषद अध्यक्ष उदय सामंत यांनी सांस्कृतिक क्षेत्रातल्या राजकारणावर भाष्य केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत