चिंचवडमधल्या श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आज उद्घाटन….
नाटय संमेलनाच्या इतिहासात यावेळी पहिल्यांदाच बाल नाटय नगरी साकारण्यात आली आहे. या बाल नाट्य नगरीचं उद्घाटन झाल्यानंतर काल ती लहान मुलांच्या आगमनानं गजबजून गेली होती. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन आज चिंचवड इथं श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलात होणार आहे. या नाट्य संमेलनाच्या निमित्याने तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्मरणिकेचं प्रकाशन आज होणार. दरम्यान, नाट्य संमेलना निमित्त नाट्य प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असलेल्या सर्व नाट्यगृहातील रंगमंचांचं काल पूजन करण्यात आले. नांदी नावाच्या या स्मरणिकेत आजवर झालेल्या 100 नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे. तसंच 1966 पासूनच्या नाटकाच्या तिकिटांचं कोलाज देखील यामध्ये पाहायला मिळणार. शहरातील पालकांनी आपल्या मुलांना पुढचे दोन दिवस इथे घेऊन यावं कारण नाटक हे संस्कार घडवणारे माध्यम आहे असे शंभराव्या नाट्यसंमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत