बौद्ध धम्म परिषद धाराशिव….

श्रद्धा संपन्न बौद्ध उपासकांनो गेल्या दोन वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्य़ात नव्याने आपण तगर भूमीची निर्मिती करत आहोत. उस्मानाबाद शहरापासून जवळच निसर्गरम्य ठिकाण असलेल्या गडदेवदरी परीसरात तगर भूमी निर्माण होत आहे . बुद्ध विहार निर्माण करताना निसर्गरम्य ठिकाण असावं हा हेतू ठेऊन गडदेवदरीची निवड करण्यात आली .
गडदेवदरीचा परीसर उस्मानाबाद शहरापासून जवळच असला तरी या ठिकाणी , रस्ता, लाईट,पाण्याची बिलकुल सोय नव्हती. तगर भूमीचे काम चालू होताच गड पाटी ते अंबेजवळगे गावा पर्यंत सात कोटी रू चा निधी रस्ता तयार करण्यासाठी मंजूर झाला , सध्या रस्त्याचे काम चालू झाले आहे , तगर भूमी उंच डोंगरावर असल्या मुळे तगर भूमी साठी जाण्याचा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी 20 लाखाचा निधी उपलब्ध झाला होता .
तगर भूमीवर येणाऱ्या उपासकांची सोय व्हावी म्हनुन कळंब – उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार आदरणीय कैलास दादा घाडगे पाटिल साहेब यांची त्याच्या स्थानिक विकास निधीतून 25 लाखाचे सभागृह ( धम्म हाॅल ) बांधकाम पूर्ण करून दिले आहे . आमदार साहेबांनी दिलेल्या सभागृहा मुळे उपासकांची गौरव टळली आहे . अनखीन तगर भूमी च्या विकासासाठी 10 कोटी निधी लागत आहे. धम्म परिषद
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत