दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत साहित्यातून वास्तवतेचे विचार मांडणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे :- सुशांत भुमकर

नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

साहित्यसम्राट केवळ दलितांसाठीच लेखन केले नसुन मानवजातीच्या अन्यायाविरुद्ध परखड विचार मांडणारे लेखक होते सामाजिक बांधिलकीसाठी ते सतत लेखन करित होते आपल्या प्रखर लेखनी द्वारे अनुभवाचे बोल व्यक्त करित आसत ते प्रभावी जातीवंत साहित्यीक म्हणून निनादात आहेत सयुक्त महाराष्ट्रातच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे खुप मोठे योगदान आहे या मुळे या ऐतिहसिक नळदुर्ग तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यामातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार आसल्याचे परखड मत भाजपाचे नेते सुशांतजी भुमकर यांनी केले
नळदुर्ग येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते
दि. १ ऑगस्ट रोजी नळदुर्ग येथील साठे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा प्रतिष्ठापानेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ः०० वाजता झालेल्या या कार्यक्रमात नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव व शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पुजन करुन पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर यावेळी थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याही प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी,भाजपचे सुशांत भुमकर, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, किशोर नळदुर्गकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आबोद्दीन कुरेशी व पत्रकार विलास येडगे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सुशांत भुमकर यांनी म्हटले की, आज खऱ्या अर्थाने समाजाला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची गरज आहे. आज प्रत्येकाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना समजुन घ्यायचे असेल तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे. आज आण्णाभाऊ साठे यांचे विचार जगाने स्विकारले आहे.केवळ दीड दिवसच शाळा शिकलेल्या आण्णाभाऊ साठे यांनी त्यांनी लिहिलेल्या साहित्याच्या माध्यमातुन जे समाज घडविण्याचे काम केले आहे त्याला इतिहासात तोड नाही. आण्णाभाऊ साठे यांचे विचार भावी पिढीना माहित व्हावे यासाठी नळदुर्ग शहरात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातुन भव्य असे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचेही सुशांत भुमकर यांनी म्हटले आहे.
यावेळी पोलिस निरीक्षक सचिन यादव, शहेबाज काझी,कमलाकर चव्हाण, ज्ञानेश्वर घोडके व विनायक अहंकारी यांनी आपल्या भाषणातुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार विस्तृतपणे मांडले.
प्रास्ताविक करतांना लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जाज्वल्य इतिहास उपस्थितां समोर मांडला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी व मातंग समाज बांधवांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!