६७ व्या वर्षी दिग्गज अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे दु:खद निधन

वयाच्या नवव्या वर्षापासून ज्युनिअर मेहमूद यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. सत्तरच्या दशकात विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी कर्करोगाने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील दफनभूमीत दफन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे.
हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्युनिअर मेहमूद यांना दोन महिन्यांपूर्वी पोटाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोग चौथ्या टप्प्यात असल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. टाटा मेमोरियलमध्ये त्यांचे उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मृत्यूशी झुंज सुरू असताना ज्युनिअर मेहमूद यांनी चित्रपटसृष्टीतील जुन्या मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आपल्या मित्राची भेट घेत त्यांची अखेरची इच्छा पूर्ण केली. आपल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी अभिनेते जॉनी लिव्हर, रझा मुराद, आदित्य पांचोली, मास्टर राजू आदी ज्युनिअर मेहमूद यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत