
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारी ते ३ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत होणार आहे. सीआयसीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षेत कला विषयाची परीक्षावगळता अन्य विषयांच्या परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार आहेत. कला विषयाची परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत घेतली जाणार आहे. तर बारावीच्या सर्व विषयांची परीक्षा दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकासह परीक्षेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. २०२४च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची नवी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कम्पार्टमेंट परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत