तोतया बँक अधिकाऱ्यांना अटक

कर्ज मिळवून देण्याच्या निमित्ताने फसवणूक करणाऱ्या तीन तोतया बँक अधिकाऱ्यांना बीकेसी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपींनी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांचा नावाचा वापर करून विश्वास संपादन केला होता़. आरोपी टोळीने नामांकित बँकेतील अधिकारी असल्याची बतावणी करून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहेत. आरोपींकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडे अनेक नागरिकांची गोपनीय माहिती उपलब्ध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तक्रारदार अश्विन अँन्थोनी किन्नी (४१) यांची या टोळीने दोन लाख ६६ हजार रुपयांना फसवणूक केली आहे. या प्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरू केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत