जुलमी व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांनी क्रांती घडवली – प्रा.प्रल्हाद यादव.

वरकुटे-मलवडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन;
वरकुटे-मलवडी : वार्ताहर एस एन सरतापे.
हजारो वर्षे दलित शोषित पीडित समाजाच्या सन्मानाला ज्या समाजव्यवस्थेनं लाथाडलं त्याच समाजव्यवस्थेचे चटके विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांदेखील सहन करावे लागले.मात्र या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांनी सामाजिक स्तरावर वैचारिक क्रांती घडवून आणली आणि स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या सर्वांवर आधारित संविधानाच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे मत प्रा.प्रल्हाद यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वरकुटे-मलवडी ता.माण येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी सरपंच विलास खरात,माजी सरपंच विजयकुमार जगताप,माजी मुख्याध्यापक पोपट बनसोडे, दिगंबर बनसोडे,ग्रा.प.सदस्य चेतन बनसोडे,रंजीत चव्हाण,बापुराव बनसोडे,तानाजी मिसाळ,महादेव काटकर,केराप्पा बनसोडे,शामराव सरतापे,ऋषीकेश भोसले,रिजवान तांबोळी,संजय चव्हाण अमोल लोखंडे, प्रल्हाद बनसोडे,अरूण केंगार,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून,सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.यावेळी सरपंच विलास खरात म्हणाले की,बहुजनांच्या उद्धारासाठी अवघं आयुष्य वेचून बाबासाहेबांनी हजारो पुस्तकांसह धर्मग्रंथांचा अभ्यास करुन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला.तर न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्रज्ञ,राजकारणी तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक असे अनेक पैलू असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर होते.त्यांनी दलितांसह बहुजनांविरोधात होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करून महिलांना आणि कामगारांना हक्क आणि अधिकार मिळवून दिल्याचे माजी सरपंच विजयकुमार जगताप यांनी सांगितले.कार्यक्रमाचे आभार पत्रकार सिद्धार्थ सरतापे यांनी मानले.६ डिसेंबर दिनी वरकुटे-मलवडीत जि.प.प्राथमिक शाळा,आंबेडकर नगरातील समाजमंदिर,य.च.हायस्कुल आदी ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत