मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण गुन्हेगारावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
तुळशीवाडी परिसरातील आंबेडकर नगर येथे स्वच्छतेचा आढावा घेत असताना पे अँड पार्कचा कंत्राटदार अब्दुल अन्वर शेख याने घनकचरा व्यवस्थापन विभागातील साहाय्यक अभियंता रंजन बागवे, दुय्यम अभियंता किरण आव्हाड आणि वाहनचालक अक्षय कांबळे यांच्या कामामध्ये व्यत्यय आणला. तसेच शिवीगाळ करून कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. यामध्ये कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रंजन बागवे यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून त्याची ऐकण्याची क्षमताही कमी झाली आहे. रुग्णालयात असतानाच बागवे यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेगाराच्या विरोधात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासाठी पोलीस ठाण्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने केला आहे. . संबंधित गुन्हेगारावर कारवाई न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत