१०० कोटींच्या औषधांच्या प्रलंबित देयकांचा अहवाल सादर करा
हाफकिन औषध निर्माण महामंडळ व संस्था स्तरावर खरेदी केलेल्या औषधांची १०० कोटी रुपयांची देयके गेल्या पाच वर्षांपासून थकीत आहेत. या देयकांसंदर्भात अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्याकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिले आहेत. त्यानुसार संचालनालयाने सर्व शासकीय वैद्याकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये आणि हाफकिन औषध निर्माण महामंडळाकडून तातडीने अहवाल मागवला आहे.
राज्यातील सरकारी रुग्णालयांना औषधपुरवठा करणाऱ्या वितरकांची देयके पाच वर्षांपासून प्रलंबित असल्यासंदर्भात ‘शंभर कोटी रुपयांची औषधांची देयके थकीत’ या मथळ्याखाली दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये ६ डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
२०१८ पासून औषध वितरकांची जवळपास १०० कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने रुग्णालयांना औषधपुरवठा करण्यात वितरकांना अडचणी येत आहेत. थकीत देयकांमुळे वितरक नव्याने काढण्यात येत असलेल्या निविदांमध्ये सहभागी होत नाहीत. देयके प्रलंबित असल्याने औषध वितरकांकडून औषधांचा पुरवठा सुरळीत होत नाही, परिणामी काही वर्षांपासून राज्यातील सर्व वैद्याकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवतो आहे.
औषधांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारने नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र वैद्याकीय वस्तू खरेदी प्राधिकरण निविदा प्रक्रियांनाही देयके प्रलंबित असल्याने वितरक व औषध उत्पादकांकडून अल्प प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे अद्याप औषधांचा तुटवडा कायम आहे. परिणामी राज्यातील विविध सरकारी रुग्णालयातील रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. रुग्णांना औषधे मिळावीत यासाठी संस्था स्तरावर स्थानिक पातळीवरून मोठ्या प्रमाणात औषध खरेदी करण्यात येत आहे. वितरकांनी त्यांची देयके तातडीने मिळावीत यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनाच साकडे घातले आहे, या संदर्भातील वृत्त ‘शंभर कोटी रुपयांची औषधांची देयके थकीत’ या मथळ्याखाली दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये ६ डिसेंबर रोजी प्रकाशित झाले होते.
या वृत्ताची दखल घेत वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने या संदर्भातील सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश वैद्याकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत