“चला निघायची वेळ झाली” ही एकांकिका स्पर्धेत प्रथम
उत्साहपूर्ण वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नागपूर विभागीय अंतिम फेरीत अमरावती येथील भारतीय महाविद्यालयाची ‘चला निघायची वेळ झाली’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. ही एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे.
लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या विभागीय अंतिम फेरीत अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची ‘हृदीर मुलम’, अमरावतीच्या भारतीय विज्ञान महाविद्यालयाची ‘चला निघायची वेळ झाली’, नागपूरच्या संताजी महाविद्यालयाची ‘ऋण’, अकोला येथील शिवाजी कला महाविद्यालयाची ‘कटम’, रातुम नागपूर विद्यापीठाच्या ओबेरॉय रोबोटिक्स सेंटरची ‘तू तुझ्यात मी माझ्यात’ या एकांकिका सादर झाल्या. मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाचही संघांनी कसून तयारी केली होती. त्यामुळे अपूर्व उत्साहात रंगकर्मींनी सादरीकरण केले.अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे उपस्थित होते. अभिनेते आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकर, पटकथा लेखक अंबर हडप यांनी विभागीय अंतिम फेरीचे परीक्षण केले आणि ‘चला निघायची वेळ झाली’ला नागपूर विभागीय फेरीचे विजेते म्हणून जाहीर केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत