मुख्य पान
रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई

मुंबई महानगरातील रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. रस्त्यांच्या बाजुला वाहने उभी केल्याने वाहतुकीला अडथळा होत असतो. अवैधरित्या वाहने पार्क केल्याने ट्रॉफिक होत असते, या समस्येपासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी मुंबई पालिका ॲक्शन मोडवर आलीय. संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या नियोजनाची आणि पूर्व तयारीची आढावा बैठक आज महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत