
तेलंगणमध्ये काँग्रेसचे ए.रेवंत रेड्डी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.राज्यपाल तामिलसाई सौंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.हैदराबादमध्ये एल.बी. स्टेडियमवर हा कार्यक्रम सुरू आहे.सोनिया गांधी,राहुल गांधी,प्रियांका गांधी,मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरीष्ठ नेते या समारंभाला उपस्थित आहेत.मिझोरममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचे नेते लालदुहोमा यांनी सरकार स्थापनेचा दावा दाखल केला असून उद्या ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.दरम्यान,मध्य प्रदेशात सरकारस्थापनेसाठी भाजपा लवकरच निरीक्षक नेमणार असल्याचं वृत्त आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत