हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द.

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री ११ वाजेपासून ते सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान बेलापूर ते पनवेल तसंच ट्रान्स हार्बर लाईनवर अप आणि डाऊन मार्गावर एकही ट्रेन धावणार नसून ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांपर्यंत (Mumbai News) असेल आणि तेथूनच ट्रेन सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करणं गरजेचं आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.
त्यामुळे या बांधकामाच्या सोयीसाठी हा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सुटेल. ही लोकल ट्रेन रात्री १० वाजून २२ मिनिटांनी पनवेल स्थानकात दाखल होईल. दुसरीकडे अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी सुटेल.
ही लोकल ११ वाजून ५४ मिनिटांनी CSMT स्थानकात दाखल होईल. त्यानंतर सीएसएमटीकडून पनवेलकडे आणि पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणारी कोणतीही लोकल नसेल. दरम्यान, हा ३८ तासांचा मेगाब्लॉक सुटल्यानंतर ब्लॉकनंतर २ ऑक्टोबरला सीएसएमटीहून पनवेलसाठी जाणारी पहिली लोकल १२ वाजून ०८ मिनिटांनी सुटेल.
ही लोकल १ वाजून २९ मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहचेल. त्याचबरोबर पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी सुटेल. ही लोकल २ वाजून ५६ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात दाखल होईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत