विद्यार्थ्यांच्या झोपेवरून शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.

अलीकडे सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी असतात; परंतु शाळेत जाण्यासाठी त्यांना लवकर उठावे लागते आणि त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा. अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्या आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या सहा योजनांचा राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’, ‘गोष्टींचा शनिवार’, ‘आनंददायी वाचन’, ‘दत्तक शाळा उपक्रम’, ‘माझी शाळा माझी परसबाग’, ‘स्वच्छता मॉनिटर – २’, ‘महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ या योजनांचा शुभारंभ करण्यासह मुंबई महानगरपालिकेच्या नवीन शालेय इमारतींचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सूरज मांढरे आदी उपस्थित होते.
‘राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये असून आज ती ओस पडली आहेत. अधिकतर पुस्तके जुनी किंवा कालबाह्य झाली आहेत. सर्व वाचनालयांना इंटरनेट, संगणक सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथालय दत्तक योजनादेखील चालू केली पाहिजे. शिक्षकांनी अध्ययनाच्या बाबतीत अद्यायावत राहावे. सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी शाळांमध्ये व्याख्याने व सत्रांचे आयोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे आनंददायी होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ कमी द्यावा तसेच खेळ व इतर कृतिशील उपक्रमांवर भर द्यावा, असेही राज्यपालांनी सांगितले. ‘गावांमध्ये एक वेळ मंदिर, मशीद अथवा चर्च नसले तरीही चालेल; परंतु आदर्श शाळा असावी. उद्योगपती मुकेश अंबानी हे स्वत: शाळांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी गुंतवणूक करण्यास तयार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत