आयआयटी मुंबई ३०३ व्या स्थानी तरआशियाई क्रमवारीत ५० वे स्थान

भारताअंतर्गतच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठ प्रथम तर आयआयटी मुंबई दुसऱ्या स्थानी आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत ३०३ वे आणि आशियाई क्रमवारीत ५० वे स्थान पटकावले आहे.
जगातील पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जगभरातील विद्यापीठांनी राबविलेल्या उपाययोजना तसेच कृतींचा प्रभाव मोजण्यासाठी ‘क्यूएस’ने जागतिक शाश्वतता विद्यापीठ क्रमवारी २०२४ जाहीर केली आहे.
‘आयआयटी मुंबईला भारतात दुसरा क्रमांक प्राप्त झाल्यामुळे आनंद झाला आहे असे सहसंचालक प्रा. एस. सुदर्शन यांनी सांगितले.
पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय आव्हाने हाताळण्यासाठी शिक्षणसंस्थेची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी ‘क्यूएस’ने निर्देशांकांची पद्धत वापरली. त्यामध्ये जगभरातील १ हजार ४०० हून अधिक विद्यापीठांचा समावेश होता. क्रमवारीत दिल्ली विद्यापीठ २२० व्या आणि आयआयटी मद्रास ३४४ व्या स्थानी आहे.
हवामान, सौरऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान, विद्युत वाहने आणि कार्बन कॅप्चर व वापर यावरील प्रकल्प हे मोठी भूमिका बजावतील. संकुलात सौरऊर्जा निर्मिती वाढण्यासाठी आयआयटी मुंबईने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. तर आयआयटी मुंबईचे संकुल हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून गेल्या काही वर्षांमध्ये वनस्पती व जीवजंतूचे जतन केले आहे’, असे सुदर्शन यांनी नमूद केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत