मशिदीत प्रचाराचे फतवे निघत असल्याचे पुरावे द्या आणि पाच लाख रुपये मिळवा ; राम सातपुतेना सोलापूरच्या मुस्लिम युवकाचे आव्हान

सोलापूर: महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मशिदींमध्ये काँग्रेसचे फतवे निघत आहेत. त्याविरुद्ध मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली होती. यावर मुस्लिम समाज नाराज झाला असून RSS च्या तालमीत तयार झालेल्या राम सातपुतेंविरोधात सर्व मुस्लिम समाजा मधून विरोध व्यक्त होत आहे.
एका मुस्लिम तरुणाने तर सातपुते यांना आव्हानच दिले आहे. “मशिदींमध्ये कोणत्याही पक्षाचा प्रचार होत असेल आणि राम सातपुते यांनी पुरावे दाखवल्यास सातपुते यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस देतो” असे सईद नाईकवाडी या सोलापूर शहरात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तरुणाने जाहीर केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत