भारतमुख्यपानसंपादकीय

‘या’ जिल्ह्यांमध्ये स्थानिकांचा विश्वास गमावणे घातकच – जम्मू विभागातल्या

जम्मू-काश्मीरचा गेल्या सुमारे ३५ वर्षांचा इतिहास हा बंडखोरी आणि दहशतवादाने रक्तलांच्छित झालेला आहे.तिघा सामान्य नागरिकांना छळ करून भारतीय सैन्याने मारले, असा दावा करणारा व्हीडिओ प्रसृत होणे ही त्रासदायक बाब आहे. मुळात २० वर्षांपूर्वी लष्कराला, निमलष्करी दलांना सहकार्य करणारी इथली जनता आता उलटलीच कशी, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे अलीकडल्या काही दशकांत या जिल्ह्यांतील हिंसाचार वाढला आहे. या दोन जिल्ह्यांतून सुरक्षादलांना वेळोवेळी दिली जाणारी आव्हाने येथील सामाजिक आणि राजकीय वैशिष्ट्यांतून आलेली आहेत. हे दोन्ही जिल्हे वैविध्यपूर्ण धार्मिक, वांशिक आणि भाषिक समुदायांची लोकसंख्या असलेले आहेत – याउलट काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लीम लोकसंख्या आहे. … जम्मू प्रदेशातील राजौरी आणि पुंछ हे एकमेकांलगतचे आणि पाकिस्तानी सीमेला खेटून असलेले जिल्हे काश्मीर खोऱ्यात नाहीत, तरीही दहशतवाद आणि लष्करीकरणाच्या हिंसक घडामोडींचे साक्षीदार ठरले आहेत. १ जानेवारी रोजी राजौरी जिल्ह्यातील डांगरी येथे सात नागरिक मारले गेल्याने २०२३ या वर्षाची सुरुवातच सावटाखाली झाली. दहशतवादाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे १९९० च्या दशकात याच राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांचा वापर पिर पंजाल पर्वतरांगा ओलांडून (पाकिस्तानातून) काश्मीर खोऱ्यात घुसखोरीसाठी केला जात असे. या पट्ट्यात १९९६-९७ पर्यंतच्या घुसखोरांना सुरक्षादलांनी अटकाव करण्याच्या, टिपून मारण्याच्या किंवा घुसखोरांशी चकमकींच्या अनेक घटना घडल्या आहेत. साधारण १९९७ पर्यंत काश्मीरमध्ये स्थानिक स्वातंत्र्यवादी गटांची पीछेहाट होऊन त्याऐवजी काश्मीरच्या अशांततेचे सूत्रधार म्हणून हिजबुल मुजाहिद्दीन, हरकत-उल-अन्सार आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या परकीय- पाकिस्तानी संघटनांनी कब्जा मिळवला होता. तेव्हापासूनच असे दिसू लागले की, जेव्हा जेव्हा दहशतवादी गटांचा आणि पाकिस्तानातील त्यांच्या हस्तकांचा डाव काश्मीर खोऱ्यात हाणून पाडला जातो, तेव्हा तेव्हा राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांतला हिंसाचार वाढतो. म्हणजे हे दोन जिल्हे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांसाठी ‘पर्यायी मार्ग’ ठरले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!