कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखा, सोलापूरच्या वतीने व्याख्यान संपन्न.

दि.03/12/23 – कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखा, सोलापूर यांचे वतीने कर्मचाऱ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती आणि संविधानाचा जागर करण्यासाठी आज रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता डॉ.व्ही.एम.मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे ए.पी.जी.अब्दुल कलाम एसी हॉल येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ.व्ही.एम.मेडिकल, सोलापूरचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रा.एम.आर.कांबळे हे व्याख्याते होते.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे यांनी करताना कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक भान वाढविण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. सोलापुरातील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. एम.आर.कांबळे सर हे “संविधान आणि लोककल्याण” या विषयावर व्याख्यान देताना या देशातील शेवटचा व्यक्ती उपाशीपोटी झोपला नाही पाहिजे याची जबाबदारी ही सरकारची असते असे सांगत संविधानातील विविध तरतुदींवर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.देशमुख यांनी कास्ट्राईब महासंघाच्या या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. आभार टी.डी.वाघमारे यांनी मानले.
यावेळी जिल्हा सचिव अरविंद जेटीथोर, कार्याध्यक्ष कल्याण श्रावस्ती, संघटक लक्ष्मण गायकवाड, कोषाध्यक्ष विजय लोंढे यांच्या बरोबरच खातेनिहाय संघटनांचे जिल्हा परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष अरूणभाऊ क्षिरसागर, सिव्हिल शाखेचे अध्यक्ष सचिन सोनवणे, नारायण देशमुख, नितीन कसबे, दत्तात्रय रेळेकर, टी.डी.वाघमारे, सुनील माने, शंकर जाधव, पाटबंधारे शाखेचे शरण अहिवळे, संतोष सरवदे, प्रदीप टकले, सचिन देसाई, अजय कोनापूरे, शशिकांत माने, भारत कांबळे, नागेंद्र मोची, विद्यापीठ शाखेचे हिप्परगे, अक्कलकोट शाखेचे नारायण जेटीथोर, दयानंद लोंढे आदी बरोबरच अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आपला विश्वासू,
मनिष सुरवसे,
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,
जिल्हा शाखा सोलापूर, सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत