
काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात तन्वीनं पहिला गेम २१-१५ असा जिंकला, मात्र अनमोलनं ही पिछाडी भरून काढत दुसरा सेट २१-१७ नं आपल्या नावावर केला. गुवाहाटी इथं पार पडलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनमोल खरब हिनं तन्वी शर्माचा पराभव करून महिला एकेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. तिसऱ्या सेटमध्येही तिनं १६-८ अशी आघाडी घेतली होती. त्या वेळी तन्वीनं दुखापतीमुळे सामना सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पुरुष एकेरीत बिगरमानांकित चिराग सेन यानं चौथ्या मानांकित तरुण एम. याचा २१-१४, १३-२१, २१-९ असा पराभव केला आणि जेतेपद पटकावलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत