टिटवाळा शहरात पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरून फेकला जंगलात.

टिटवाळा शहरात पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरून जंगलात फेकल्याचा केल्याची घटना समोर आली आहे. तसेच आरोपीने पत्नीच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून, तिची गळा आवळून हत्या केली. अलीमुन अन्सारी (वय 35) असं मृत पत्नीचं नाव आहे. तर मैनोद्दीन अन्सारी असं आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती आपल्या पत्नीची इतक्या निर्घृणपणे हत्या करुच कसा शकतो? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. याप्रकरणी मृत महिलेचे वडील मोहमंद इंद्रीस सुबेदार खान यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
फिर्यादी मोहमंद इंद्रीस सुबेदार खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मैनोद्दीन अन्सारी याचं 2012 मध्ये अलीमुन अन्सारी यांच्याशी लग्न झालं होतं. दोघांना 11 वर्षांचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर मैनोद्दीन आपल्या पत्नीसोबत चांगलं वागत होता. पण गेल्या तीन वर्षांपासून तो पत्नीला आपल्या माहेरच्यांकडून रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आण, असा तगादा लावत होता. तो पैशांसाठी सातत्याने पत्नीला मारहाण करायचा. शेवटी अलीमुनच्या आई-वडिलांनी 80 हजार रुपये दिले. पण तरीही तो सातत्याने अलीमुनच्या मागे पैशांसाठी लागत होता. याबाबत अलीमुनच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सविस्तर सांगितलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत