
करोनाकाळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली नुकताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमिन छेडा, महापालिकेचे संबंधित अधिकारी व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन छेडा यांनाही अटक केली होती. त्याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.
करोनाकाळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम अर्धवट असताना ते पूर्ण झाल्याचे सांगत सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत