छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय २ डिसेंबरपासून नागरिकांसाठी करण्यात येणार खुले नवीन वर्षाच्या १ ऑक्टोबर पर्यंत.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात भारतासह इजिप्त, असिरिया, ग्रीस आणि रोम या देशांच्या प्राचीन संस्कृतींवर आधारित असलेल्या ‘प्राचीन शिल्पे झ्र भारत इजिप्त अॅसिरिया ग्रीस रोम’ या नवीन दालनाचे उद्घाटन शुक्रवार करण्यात आले. हे दालन शनिवार, २ डिसेंबरपासून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असून १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ते नागरिकांसाठी खुले असणार आहे.
भारत, इजिप्त, अॅसिरिया, ग्रीस आणि रोम या देशांतील शिल्पांमध्ये काही साधर्म्य आढळून येते. या शिल्पांच्या आधारे या देशांमधील सांस्कृतिक साम्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न या नव्या दालनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या दालनाच्या उद्घाटनासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, गेटी संग्रहालयाचे सल्लागार निल मकग्रेगोर आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत