भारतीय नौदलाने केले स्पष्ट ; महाराष्ट्राच्या सागरी किनारी सुरक्षेत त्रुटी

महाराष्ट्राच्या सागरी किनारी सुरक्षेत त्रुटी असल्याचे भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे. तसेच, या त्रुटींबाबत राज्य सरकारला कळविण्यात आल्याची माहिती नौदलाच्या पश्चिम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी सागरी मार्गाने दहा पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी गोळीबार करून सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आणि पाच अमेरिकी नागरिकांसह एकूण १६६ नागरिकांना ठार केले. या हल्ल्यात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. या दहशतवादी हल्ल्यामुळे किनारपट्टीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर सागरी सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु या प्रयत्नानंतरही महाराष्ट्राच्या सागरी किनारा सुरक्षेत त्रुटी असल्याचे समोर आले. त्याबाबतची माहिती राज्य सरकारला देण्यात आल्याचे नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख दिनेश के. त्रिपाठी यांनी सांगितले.
सागरी सुरक्षा ही केवळ नौदलाचीच नाही, तर राज्य सरकारसाठीही महत्त्वाची असल्याचे त्रिपाठी यांनी म्हटले. नौदलाच्या मुंबईतील मुख्यालयात किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेल्या नौकांच्या कमतरतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्रिपाठी यांनी उपरोक्त माहिती दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत