जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी पाणीपुरवठा तात्पूरता खंडीत

मुंबई मेट्रो प्रकल्पाचे खोदकाम सुरू असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मुख्य जलवाहिनी गुरुवारी फुटली. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम आज, शनिवारी सुरू करण्यात येणार असून सकाळी साडेआठ वाजल्यापासून २४ तासांसाठी अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमेकडील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे. तर, वांद्रे ते गोरेगाव परिसरात अनेक ठिकाणी पाणी येणार नाही. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
वेरावली जलाशयाच्या १८०० मी. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी गळती सुरू झाली. जलवाहिनीच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले होते. मात्र, या दुरुस्तीचे मोठे काम शनिवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, शनिवारी आणि रविवारी पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. या काळात वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहर ते भांडुप या परिसरात काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. तर अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील. वांद्रे पश्चिम मध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा कमी वेळ होईल, असे पालिका प्रशासनाने कळवले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत