कोल्हापुरातील स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने कंत्राटी नोकरभरती च्या निर्णयाचा विरोध, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचा रास्ता रोको

कोल्हापुरातील इचलकरंजी फाटा येथे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने राज्य सरकारनं घेतलेल्या कंत्राटी नोकरभरती च्या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यासाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
राज्य सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील इचलकरंजी फाटा येथे रास्ता रोको करत निदर्शने करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली. हे आंदोलन राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तब्बल अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूकडील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान सरकारच्या आदेशाची होळी करत असताना पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.
रास्ता रोको करत शासनाच्या आदेशाची होळी
राज्य सरकारने उच्चवर्गातील सरकारी जागा ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या जागा भरण्यासाठी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असून यामध्ये या कंपन्यांना कमिशन देखील देण्यात येणार आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या सर्वाविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोल्हापुरातील इचलकरंजी फाटा येथे रास्ता रोको करत शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत