निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरात
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस का पराभूत झाल्या? राजकीय विश्लेषकांच्या मते त्याची अनेक कारणे असतील पण माझ्या मते त्या पराभूत होण्यामागे त्या “भारतीय वंशाच्या” नेत्या आहेत हे एक प्रमुख कारण आहे. जगावर राज्य करण्याची भाषा करणाऱ्या प्रगतशील, पुरोगामी, प्रसिद्ध देशातील मतदारही एका टप्प्यावर प्रांतवाद, वंशवाद वर्णभेद बघतात आणि तो मनापासून जोपासतात. त्यात त्यांना काही अयोग्य वाटत नाही. साता समुद्रापारची बात सोडा पण आपल्या शेजारची दक्षिण राज्य कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मध्येही प्रादेशिक अस्मिता ठासून भरली आहे. साधी राष्ट्रभाषा “हिंदी” ते बोलत नाहीत. जात, पात, धर्मात आग लावून आपली पोळी भाजणाऱ्या भाजपला दक्षिण भारताने अजून पूर्णपणे स्वीकारलेले नाही. हे झालं दक्षिण भारताचे. आपले दुसरे शेजारी राज्य गुजरात आणि राजस्थान मध्येही प्रादेशिक अस्मिता जपली जाते. आपल्या राज्याचा पंतप्रधान होतोय म्हटल्यावर दहा वर्षापूर्वी संपूर्ण गुजरात राज्य नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. गेली अनेक वर्ष भाजप आणि संघाकडे असलेली पैशांची पोकळी गुजराती उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांनी भरून काढली. गुजरात मधील सर्व यंत्रणा कामाला लागली. मिडिया हाऊस विकत घेतले गेले. साम, दाम, दंड, भेद निती वापरून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान केल्यानंतर गुजरातच्या जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला. गुजरातमधून २०१४ आणि २०१९ साली २६ पैकी २६ खासदार भाजपचे निवडून दिले. २०२४ साली २६ पैकी २५ खासदारांचे पाठबळ मोदी यांच्या मागे उभे आहे. याला म्हणतात गुजराती अस्मिता. गुजरातने हे आज नाही केले. देश स्वतंत्र होण्यापूर्वी गुजरातने हेच केले होते. लोकमान्य टिळक, गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, वि.दा.सावरकर असे असंख्य मराठी स्वातंत्रवीर असताना टिळकांच्या अस्तानंतर दक्षिण आफ्रिका मधून आलेल्या गांधीचा उदय हा गुजराती समाजाने रचलेले “एक वेल प्लॅन मॅनेजमेंट” होते. दळणवळणाची प्रभावी साधने नसताना संपूर्ण गुजरात कामाला लागला. गांधी यांच्यासाठी दिल्लीतील बिर्ला हाऊसचे दरवाजे खुले करण्यात आले. अनेक उद्योगपतींनी आपल्या तिजोऱ्या खाली केल्या. गांधींचे “चले जाव” आंदोलन कोणतीही समाज माध्यम यंत्रणा नसताना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले गेले. गांधींना “महात्मा” बनविण्यात ह्या गुजराती समाजाचा सिंहांचा वाटा आहे. नव्हे त्यासाठी रितसर सर्वच प्लॅनिंग होते. गुजरातने स्वातंत्र्यनंतर एक मोठा उद्योगपती तयार केला. त्यासाठी त्यांच्या पाठीशीही ठामपणे उभे राहिले आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल विकणारा एक मुलगा या देशाचा सर्वात मोठा “बिझनेसमन” झाला. त्यांचे नाव सर्वांना माहीत आहे. धीरूभाई हिराचंद अंबानी. गुजरातने जागतिक पातळीवर मोठी केलेली ही तीन नावे. गांधी, अंबानी, आणि मोदी. हे तिघेही गुजराती आहेत आणि त्यांच्या समाजाने त्यांना ठरवून मोठे केले. त्यांच्या पाठीशी डोंगरा सारखे उभे राहिले. नमनाला घडाभर तेल घालून मला काय सांगायचे ते महत्वाचे आहे. १९९१ मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी असताना त्यांना कडाडून विरोध करणाऱ्यांमध्ये शंकरराव चव्हाण (अशोक चव्हाण यांचे वडील), विठ्ठलराव गाडगीळ, वसंत साठे ही सर्व मराठी माणसे होती. मराठी माणसाच्या याच खेकडे प्रवृत्ती पायी अनेकांची संधी हुकल्या आहेत. अनेक चुका मराठी माणसाच्या हातून झालेल्या आहेत. त्या सर्व चुका सुधरवण्याची एक संधी चालून आली आहे. राज्याची विधानसभा निवडणूक. ही निवडणूक महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशीच आहे. ही विरोधकांची भाषा नाही. प्रत्येक मराठी माणसाने अंतर्मुख होऊन विचार करावा अशी परिस्थिती आहे. राज्याचे अनेक उद्योग गुजरात मध्ये गेले. हे सर्वांना माहीत आहे. त्या उद्योगांबरोबर लाखो रोजगार गुजरात मध्ये गेले. गुजरात मधील व्यापाऱ्यांची ने-आण करण्यासाठी तब्बल सव्वा लाख कोटी रुपये खर्चून बुलेट ट्रेन सूरू केली जाणार आहे. म्हणजे गुजराती व्यापारी दिवसभर मुंबई लुटून सहज गुजरातला जाऊ शकणार आहेत. महाराजांना सुरत लुटायला तीन महिने प्लॅनिंग करावं लागलं. तो वचपा गुजराती दररोज काढणार आहेत. उद्योगपती गौतम अदानी यांना धारावी पुनर्विकासाच्या बदल्यात मुंबईत मोक्याच्या ठिकाणी अकराशे एकर जमीन दिली जात आहे. देशात सर्वप्रथम मूठभर इंग्रज “व्यापारी” म्हणून कोलकत्यात आले होते. आणि नंतर ते देशाचे राज्यकर्ते बनले. राज्यातही बोटावर मोजण्याइतके गुजराती आले आहेत आणि ते राज्य काबीज करत आहेत. हे मोठं षडयंत्र आहे. सर्वसामान्य जनतेच्या आकलना पलीकडे आहे. पण महाराष्ट्राला पोखरण्याचे काम मागील दहा वर्षात युद्ध पातळीवर सूरू आहे. हा धोका मराठी माणसाने आजच ओळखावा. नाहीतर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. एक साधं उदाहरण देतो. नवी मुंबईत गुजराती समजाचे मोठे प्राबल्य आहे. संपूर्ण एपीएमसी मार्केट गुजराती समाजाच्या हातात आहे. साहजिकच मोठया प्रमाणात लोकवस्ती गुजराती आहे. दहा वीस गुजराती व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी आगरी कोळी बांधवांचे, सिडको कडून भुखंड विकत घेतले. त्यासाठी सर्व पैसा गुजरात मधील कच्छ भागातून आणला. आज नवी मुंबईतील ८० टक्के बिल्डर गुजराती आणि इमारती गुजराती बिल्डरने बांधलेल्या आहेत. तुमचा गुजराती मित्र कितीही चांगला असो पण तो तुम्हाला धंदा पाण्यासाठी कधीही मदत करणार नाही. एकवेळ तुमच्या खाण्यापिण्यावर हजारो रूपये उडवेल पण तो तुम्हाला व्यापारी उद्योजक बनवणार नाही. अनेक मराठी नेत्यांचे कोट्यावधी रुपये गुजराती बिल्डरांकडे व्याजाने लागले आहेत. त्यात काही जणांचे डुबले आहेत. थोडक्यात कोणताही गुजराती तुमचा होऊ शकत नाही. देशात आजही अनेक मुसलमान पाकधार्जिणे आहेत. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या १०५ हुतात्म्यांवर गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या मोरारजी देसाई यांच्या गुजरातचे समर्थन देणारे गुजरात धार्जिणी राजकीय मंडळी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे गुजराती समाजाचे फावले आहे. मराठी माणसाची ही नस त्यांनी ओळखली आहे. महाराष्ट्राचे वैभव “मुंबई”चे महत्व कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मुंबईचे “आर्थिक राजधानी” हे बिरूद हिरावून घेण्याचे काम छुप्या पद्धतीने सूरू आहे. महाराजांनी सुरत लुटली ही सल आजही गुजराती माणसाच्या मनात ठस ठसत आहे. म्हणूनच महाराष्ट्र लुटला जात आहे. त्याला महायुतीच्या नेत्यांनी खतपाणी घातले आहे. गुजरातच्या पायाशी लोटांगण घातले आहे. महायुतीने अनेक कामे केली आहेत. हे सत्य आहे पण ही कामे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यासाठी केली गेली आहेत. असा वास येतो. राज्यात आतपर्यंत कधीच झाला नाहीं इतका भ्रष्टाचार हया अडीच वर्षात झाला आहे. त्यामागे गुजरात कनेक्शन आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागात दलालांचा सुळसुळाट झाला होता. दुनिया में सबकुच बिकता हैं. खरीदने वाला चाहिए ही भावना वाढीस लागली. महाराष्ट्र त्याला बळी पडला आहे. हवं तर एखाद्या प्रामाणिक शासकीय अधिकाऱ्याला विचारुन बघा.राज्यातील सर्व मोठी कामे ही गुजरात मधील कंपन्यांना देण्यात आली आहेत. महाराष्ट्र गुजरातकडे गहाण पडला आहे. तो सोडवायचा असेल तर प्रत्येक मराठी माणसाने गुजरातला साथ देणाऱ्या नेत्यांना घरी बसवले पहिजे. मराठी ताकद दाखवण्याची हीच ती वेळ आहे. अभी नहीं तो कभी नहीं. अशी स्थिती आहे. महाराष्ट्राचे कसे वाटोळे झाले आहे. हे बघायचे ऐकायचे असेल तर प्रसिद्ध युटुबर ध्रुव राठीचा एक व्हिडियो सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. तो नक्कीच बघा आणि महाराष्ट्राचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा! तूर्त इतकेच…
@विकास महाडिक, पत्रकार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत