बळीराजाला पाताळात गाडणाऱ्या शक्ती सत्तेवर येता कामा नये त्यांचे डिपॉझिट जप्त करा.-श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर
बळीराजाला पाताळात गाडणाऱ्या शक्ती सत्तेवर येता कामा नये त्यांचे डिपॉझिट जप्त करा. टेंभूचे पाणी आम्ही आणले म्हणता. टेंभूचे जनक म्हणून घेता. पाणी संघर्ष चळवळीचे नागनाथ अण्णा नायकवडी, स्वतः मी व भाई गणपतराव देशमुख आणि चळवळीतील कार्यकर्ते आम्ही काय गोठ्या खेळत होतो का? 1992 93 साली पहिली पाणी परिषद आटपाडी येथे घेतली. आंदोलन मोर्चे काढून शासनावरती दबाव आणून टेंभूचे कर्जरोखे काढण्यात आले. टेंभूचे श्रेय कोणा एकाचे नाही. यामध्ये सर्वांचे योगदान आहे असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
ते बलवडी (भा.) येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांना श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. पाटणकर पुढे म्हणाले की, आटपाडी सारखीच तासगावमध्ये स्वर्गीय आर. आर.आबा पाटील यांनी पाणी परिषद घेतली. त्यावेळी स्वतः स्वर्गीय आमदार बाबर यांनी पाणी संघर्ष चळवळीच्या चळवळीत मी सक्रिय झालो नाही. त्यामुळे माझा 1995 साली पराभव झाल्याचे त्यांनी मान्य केले होते.
टेंभूच्या विस्तारित 6 टप्पा योजनेचे काम महाविकास आघाडीचे सरकार असताना मंजूर झाले आहे. बंद पाइपने पाणी हा आटपाडी पॅटर्न सर्वत्र राबला पाहिजे म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल. दुष्काळी भागाचा शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवायचा असेल तर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्या. श्रमिक मुक्ती दल आणि पाणी संघर्ष चळवळीचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील म्हणाले की, खोटे, लबाड बोलणारे भ्रष्टाचारी सरकार घालवून शेतकरी, कष्टकरी कामगारांचे प्रश्न सोडवणारे, शेतीमालाला हमीभाव देणारे, खते बी बियाणे योग्य भावात देणारे, शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून जे पशुधन पालन केले जाते. अशा शेती पूरक व्यवसायांना विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य आर्थिक मदत उपलब्ध करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणे काळाची गरज आहे. राजकारणात झालेली बजबज पुरी, आमदारांचा बाजार, भ्रष्टाचार आणि महागाईचा उच्चांक करणारे सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम आहे. म्हणून महाविकास आघाडीला सर्वांनी ताकद द्या. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव दादा पाटील यांना भरघोस मताने विजयी करून शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करा.
स्वागत प्रास्ताविक प्रशांत पवार यांनी केले. यावेळी कैलास पवार, सतीश लोखंडे, रोहित पवार यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाला नितीनराजे जाधव, सरपंच मानसिंग जाधव,माजी सरपंच रघुनाथ पवार, प्रवीण पवार, संजय महाडिक, उपसरपंच शब्बीर मुलाणी, प्रसाद पवार, चंद्रकांत पवार, पांडुरंग चव्हाण, विलास चव्हाण, आनंदराव पाटील, मेजर मच्छिंद्र पवार, शहाजी बंडू पवार, सुरेश चव्हाण, शिवाजी पवार, हणमंत पवार , सुबराव पवार, बाबुराव बाळकू पवार, नंदकुमार जाधव, बाळासो जाधव, पोपट श्रीपती पवार, टी. के. पवार सर, संतोष जाधव सर, आशिष पवार, सचिन तानाजी पवार, दीपक पवार, भिकाजी पवार, देवकुमार दुपटे, दाजीराम दुपटे आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत