“समतेत” पालकांच्या उपस्थितीत गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार !
धाराशिव : धाराशिव शहरातील सुप्रसिद्ध मराठी कन्या प्राथमिक शाळा आणि समता उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज 30 नोव्हेंबर 2023 रोजी, सकाळी ठीक 09.00 वाजता,संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सोनार एन.आर,डोके सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 2022/23 शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सोनार एन.आर( संस्था अध्यक्ष ),डोके आर.एन ( संस्था संचालक),कुंभार बी.जे,( संस्था सहसचिव ),एडके एम.आर,( संस्था उपाध्यक्ष),श्रीमती.एडके एस.एम (मुख्याध्यापिका) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव शहरातील मराठी कन्या प्राथमिक शाळा व उच्च महा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022 23 मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इयत्ता दुसरीत कु.श्लोक सुनील भोसले याने एम.टी.एस परीक्षेमध्ये राज्यातून तिसरा क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविल्याने शाळेच्या वतीने त्याचा सन्मानचिन्ह आणि सायकल भेट देऊन सत्कार करण्यात आला.तसेच
यावेळी एम.टी.एस,अक्षरगंगा,
शिष्यवृत्ती आणि इयत्ता दहावी आणि बारावी अशा अनेक महत्त्वाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन यश मिळविलेल्या साळुंखे सुहास राहुल,पाटील अनवी प्रशांत,लाड प्रणव पांडुरंग तर इयत्ता चौथीचे गायकवाड सम्यक समाधान,बोंदर अविष्कार हरिदास,आदटराव आरुष अरुण, तसेच इयत्ता सहावीचे गंगावणे दर्शन राजकुमार,कांबळे आदित्य निलकिरण आणि इयत्ता सातवीचे चव्हाण संस्कार सचिन,कुलकर्णी आयुष हर्षल,यांच्यासह इयत्ता पहिलीतून एम.टी.एस ओलंपियाड परीक्षेत उत्तीर्ण असलेल्या घोगरे आयुष अजित,नलावडे श्लोक श्रीकांत,वैरागकर स्वानंदी शिवराज,मेनकुदळे यशदीप गजानन यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर बाकी 09 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आणि इयत्ता दुसरीतील मैदाड यशराज चित्रगंधा,साळुंखे रुद्राक्ष राहुल यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर बाकी 16 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.तर यावेळी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,पुणेच्या परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या वसुंधरा संजय गुरव,तर क्रीडा क्षेत्रातील ओमकार लक्ष्मीकांत,शिष्यवृत्ती मध्ये उत्तीर्ण असलेल्या अनुज नवनाथ जप्ती, सोहम शिवाजी पवार, गाढवे यश स्वप्निल यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत यश मिळणाऱ्या प्रसन्न गणेश देशमुख (जिल्ह्यात प्रथम),तर एन.सी.ई मध्ये यश मिळविणाऱ्या आहेर शिवकन्या चांगदेव (केंद्रात प्रथम) यांनाही सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांना डोके आर.एन,कुंभार बी.जे,एडके एम.आर यांनी समायोचित असे मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनार एन.आर आपल्या मार्गदर्शनास सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणासह आचरणाचे अर्थात वागणुकीतून कौशल्य आणि गुण सिद्ध केले पाहिजे.तसेच शिक्षक आणि पालकांच्या सहकार्यातून आपण स्वगुणा वर आयुष्यात नावलौकिक मिळवणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच शाळा,शिक्षक आणि परिवाराचा नावलौकिक मिळवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असले पाहिजे.तर शिक्षणातून केवळ गुण मिळवून किंवा पारितोषक मिळवून उपयोग नाही तर आपल्या आचरणातून आणि वागणुकीतून समाजापुढे स्वगुणाचा आदर्श ठेवावा लागेलं तरच आपल्या गुण आणि पारितोषिकांना महत्त्व प्राप्त होते असा अनमोल सल्ला विद्यार्थ्यांना व पालकांना देत,विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचेही कौतुक यावेळी सोनार सरांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिसाळ सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बर्डे सर, घावटे मॅडम यांनी केले आणि कार्यक्रमास उपस्थितांचे आभार उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एडके एस.एम यांनी मानले.यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालक यांच्यासह दोन्ही विभागाच्या शिक्षक वृंदासह सर्व कर्मचारी समूह मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पत्रकार : विजय अशोक बनसोडे
उस्मानाबाद
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत