दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

78वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम–विनायकराव जामगडे

देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या उल्लासात मानला जात आहे.अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान देऊन चळवळीला गती दिली.आपले तारूण्य कुरबान केले. फाशिच्या तख्तावर खुषीने चढले.घर संसार त्यागाला स्वप्न एकच होते भारत देशाला स्वातंत्र्य मिळून सर्वांना ते उपभोगता येईल.गरीब श्रीमंत गुण्यागोविंदाने नांदतील.
इंग्रज सरकारने सत्ता भारतीयांना सोपविली.15 आगष्टला देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला.
दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या जोषात साजरा करित असतो.अनेक स्वप्न रंगविले जाते.


या स्वातंत्र्यात अनेक लोकांना अन्नाशिवाय उपाशि पोटी झोपावे लागते. कष्ट करून सुद्धा दोनवेळेचे भोजन नशिबी नसते.अनेक लहान मुलांना शाळेत न जाता पोटभरण्यासाठी काबाडकष्ट करावे लागते.तर मूठभर लोकांना अपचन होते .झोप लागत नाही.झोपेचे औषध खावे लागते. बर्याच लोकांना उघड्यावर संसार थाटावा लागतो.उन वाऱ्यात थंडीत पावसात जिवन कंठावे लागते.शिक्षणापासून कोशो दूर आहेत.येथे भांडवलशाही सरंजामशाही आपला प्रभाव दाखवित असते.गरीबाचे शोषण मोठ्या प्रमाणात केले जाते.गरीबाना देशभक्तीचे धडे दिले जाते.गरीब देशांसाठी सर्वस्व त्यागाला तयार असतो. परंतु येथील मूठभर लोक स्वातंत्र्याचा उपयोग करून आपल्या धनसपतीत भरमसाट वाढ करित असतात.शासन प्रशासनात यांचाच भरणाअसतो.
सामाजिकदृष्ट्या एक वर्ग मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहापासून दूर आहे.देऊळात जाऊन देवाचे दर्शन घेता येत नाही.महिलाना देवदर्शनाला बंदी आहे.


कोणी कोणत्या देवाची उपासना करावी हे सुद्धा स्वातंत्र्य नाही.कोणी काय खावे यावर प्रतिबंध असून त्यांनी गोमांस खाल्ले म्हणुन त्याची हत्या केली जाते.एका समाजाविरुद्ध भडकविलेजाते. त्याला समाज बहिष्कृत केले जाते. त्यांच्या विरूद्ध दहशत निर्माण करून दहशतीत ठेवले जाते. अस्पृश्य मुलीवर लैंगिक अत्याचाराची परवानगिच असते. आजही जातीच्या नावाने छळले जाते. बुद्ध समाजाच्या लोकांना विहार बांधण्यास शासकिय जागा उपलब्ध करून दिली जात नाही. हिंदुंचे देवळे उभारण्यात कोणतीच आडकाठी नसते.उलट त्यांना पूर्ण सहकार्य केले जाते.
स्वातंत्र्य दिन साजरा करताना ह्या बाबींचा विचार करण्यात यावा.असमानता दूर होऊन समता प्रस्थापित होईल त्या दिवशी स्वातंत्र्य साजरा करण्याचे समाधान लाभेल.
विनायकराव जामगडे
7823093556
9372456389

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!