आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर –

आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे.
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर –
( २ मार्च १९३० रोजी केलेले भाषण)
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा
गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।। २
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
आघडी वर होता जरी नवं-कोटी चा राजा,आघडी वर होता जरी नवं-कोटी चा राजा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।
माणसास पाणी पाजा,माणसास पाणी,निनादात होती सारी भिमाचीच वाणी,
माणसास पाणी पाजा,माणसास पाणी,निनादात होती सारी भिमाचीच वाणी,
निनादात होती सारी भिमाचीच वाणी,
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।
दार उघड रामा आता,दार उघड रामा आता,पांढरी चा चोखा मेळा आला तुझ्या धामा,
दार उघड रामा आता,दार उघड रामा आता,पांढरी चा चोखा मेळा आला तुझ्या धामा,
पांढरी चा चोखा मेळा आला तुझ्या धामा,
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा, दर्शनाची संधी भीम मागत होता माझा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।
सर्वांच्या होता पुढे कर्मवीर दादा,काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,
सर्वांच्या होता पुढे कर्मवीर दादा,काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,
काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,
जय घोष जय भीमाचा झाला गज वाजा,जय घोष जय भीमाचा झाला गज वाजा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।
राम दाखवारे तुमचा राम दाखवारे,वामन ला त्याची थोडी चावेचाखवारे,
राम दाखवारे तुमचा राम दाखवारे,वामन ला त्याची थोडी चावेचाखवारे,
वामन ला त्याची थोडी चावेचाखवारे,
बोलले पुजारी आता भेडग्यांनो जा जा,बोलले पुजारी आता भेडग्यांनो जा जा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।
गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।
कवी – महाकवी वामनदादा कर्डक 🌹🌹🙏
समाज माध्यमातून साभार….
सद्धम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम.
सुधाकर ग्यानुजी पखाले
9075233272.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत